भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

सावदा शहरात मोकाट बकऱ्यांचा हौदोस नागरिक त्रस्त !

सावदा (प्रतिनिधी)। शहरात मोकाट बकऱ्या न मुळे नागरिक त्रस्त झाले असून नगरपालिकेने मोकाट फिरणाऱ्या बकऱ्यांचा त्वरित बंदोबस्त करावा काजीपुरा भागातील मज्जित मागील बकऱ्यांचा झुंड सतत गल्लीबोळातून मोकाट फिरत असतो याबाबत बकऱ्यांच्या मालकाला घरी जाऊन वारंवार तोंडी सांगितले असता ते उलट बोलत असतात

गल्लीमध्ये मुंजोबा चे देवस्थान असून पिंपळगाव चा मोठा वृक्ष आहे पिंपळाचे पान खाण्याकरता बकऱ्या देवस्थानावर चढत असतात बकऱ्यांची पायाची घाण देवावर पडत असते तिथे नागरिक रोज सकाळी पूजाअर्चा करतात फुल हार वाहतात ते सर्व सामग्री बकऱ्या खाऊन जातात त्यामुळे देवस्थानाची पवित्रता नष्ट होते हिंदू धर्माच्या भावना दुखावतात पावसाळ्याच्या दिवसात घरासमोर लावलेली झाडं वेली बकऱ्या खाऊन टाकतात घरात घुसून शेतकऱ्याचं अन्नधान्याचे नुकसान करतात गुराढोरांना आणलेला चारा खातात अशा अनेक प्रकारचा त्रास नागरिकांना होत आहे बकऱ्यांच्या मालकाला सांगायला गेल्यास ते अरेरावीची भाषा वापरतात या होणाऱ्या त्रासापासून मोकाट बकऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!