सावदा सह परिसरातील राम भक्तांनी दि ५ रोजी विद्युत रोषणाई किंव्हा दिवे लावावे- वि.ही.प. चे आवाहन !
सावदा (प्रतिनिधी)। अनेक कालखंड पासून प्रलंबित असलेल्या अयोध्येत दि ; ५ रोजी अभिजित मुहूर्तावर प्रभू श्रीरामचंद्राच्या भव्य दिव्य उभारण्यात येत असलेल्या मंदिराचे वास्तू चे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सह राज्यातील मुख्यमंत्री व संताच्या प्रमुख उपस्तीतीत हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार असून या ऐतिहासिक सोहळा प्रसंगी कोरोना व्हायरस पार्श्वभूमी लक्षात घेऊन राम भक्तांनी कोठेही एकत्र न जमता आप आपल्या घरा समोर रांगोळ्या काढून संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास विद्युत रोषणाई किंवा घरोघरी १३ तेलाचे दिवे लावावे व उपक्रम उत्साहात राबविण्यात यावा असे आवाहन वि .ही .प .प्रदेशमंत्री विजय देशपांडे यांनी पत्राद्वारे केले आहे.
राम भक्तांनी उपरोक्त राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे दिवशी गावा गावात असलेल्या राम मंदिरामध्ये सोशल दिशिंगशन चे पालन करत रामाच्या प्रतिमेचे विधिवत पुजन करावे. पुज्या करण्या साठी येणाऱ्या भाविकानी मास्कचा वापर करावा बंधनकारक राहिल. रामभक्ततांनी घरा घरामध्ये राम रक्षा मंत्राचे त्रोत म्हणावे, शक्यता झाल्यास रामभजन मोठया आवाज घरामध्ये लावावे. घराच्या छतावर भगवा ध्वज लावावा . नैवेद्यासाठी पुरणपोळी , एखादा गोड पदार्थ साखरेचा नैवैद्यश्रीरामा ला दाखवावा . असे आवाहन प्रसिद्धी पत्राद्वारे विश्व हिंदू परिषद प्रचार प्रसार विभाग परिषदप्रदेश अध्यक्ष पांडुरंग राऊत व प्रदेश मंत्री विजय देशपांडे यांनी केले आहेत .