आरोग्यरावेर

सावद्यात आज एक महिला व एका पुरुषाचा तपासणी अहवाल कोरोना बाधित  !

सावदा (प्रतिनिधी)। आज आता आलेल्या कोरोना तपासणी अहवालात शहरातील २ अहवाल बाधित आढळून आल्याने निष्पन्न झाले आहे. 

शहरातील आज आलेल्या तपासणी एका ६० वर्षीय महिलेचा व एका ५२ वर्षीय पुरुषाचा तपासणी अहवाल बाधित आढळून आला असून सदरील महिला रामदेव बाबा नगर मधील रहिवासी असून पुरुष हा सुगंगा नगर मधील रहिवासी आहेत. सदरील परिसर  प्रशासनाकडून सील करण्यात येत आहे.

सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ९८ झाली असुन त्यात १० मयत तर ११ उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला हरवत घरी परतले आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!