सावद्यात आज दोन तपासणी अहवाल कोरोना बाधित !
सावदा (प्रतिनिधी)। आज आता आलेल्या कोरोना तपासणी अहवालात शहरातील पुन्हा २ अहवाल बाधित आढळून आल्याने निष्पन्न झाले आहे.
शहरातील आज आलेल्या तपासणी २५ वर्षीय व २१ वर्षीय दोन तरुणांचे तपासणी अहवाल बाधित आढळून आले असून सदरील धान्य मार्केट मागील परिसरातील रहिवासी आहेत. सदरील परिसर प्रशासनाकडून आधीच सील करण्यात आला आहे. सदरील वृत्तास नगरपालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ९६ झाली असुन त्यात १० मयत तर १२ उपचार घेत आहेत तर बाकी सर्व घरी सुखरूप परतले आहेत.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा