भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

सावद्यात पुन्हा एका नगरपालिका कर्मचाऱ्यांसह दोन अहवाल कोरोना बाधित तर एका आधीच्या बाधितांचा मृत्यू !

सावदा (प्रतिनिधी)।  शहरात कोरोना संसर्ग पुन्हा प्रभाव दाखवत असल्याचे दिसून येत आहे. काल रात्री आलेल्या १ व्यक्तीचा तपासणी व आज सकाळी आलेल्या कोरोना तपासणी अहवालात शहरातील १ व्यक्तीच्या अशे २ तपासणी अहवाल बाधित आढळून आल्याने निष्पन्न झाले असून तसेच तीन दिवस आधी बाधित आलेल्या एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील आलेल्या अहवालामध्ये पुन्हा दोन अहवाल बाधित आढळून आले आहे तर तीन दिवसांआधी बाधित आढळून आलेल्या एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधित आढळून आलेल्या मध्ये काल रात्री उशिरा आलेल्या ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तींचा व आज सकाळी एका ४५ वर्षीय नगरपालिका कर्मचाऱ्यांस कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले आहे. सदरील वृद्ध व्यक्ती प्लॉट एरिया परिसरातही तर नगरपालिका कर्मचारी ओम कॉलनी खंडेराव वाडी मागील परिसरातील रहिवासी आहे. तसेच तीन दिवस आधी बाधित आढळून आलेल्या एका वृद्ध रुग्णांचा काल मृत झाला आहे. सदरील परिसर प्रशासनाकडून सील करण्याची प्रकिया सुरू असुन खबरदारी म्हणुन संपर्कातील व्यक्तींना प्रशासनाकडून कॉरटाईन करण्यात येत असून परिसर निर्जंतुक करण्यात आला आहे. सदरील वृत्तास नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.

सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ७६ झाली असुन त्यात १० मयत तर १६ उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला हरवत घरी परतले आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!