भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

सावद्यावर कोरोनाची पुन्हा वक्रदृष्टी; आणखी 6 रुग्ण बाधित !

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी)।  आज आलेल्या कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन कोरोना बधित रुग्णांच्या संख्येत 6 रुग्णांची भर पडली असुन सदरील 3 रुग्ण जगमाता मंदिर परिसरातील  54 वर्षीय व 75 वर्षीय महिला, 21 वर्षीय मुलगी तर 2 रुग्ण पाटीलपुरा भागातील 42 वर्षीय पुरुष , 65 वर्षीय महिला असून 1 रुग्ण 12 वर्षीय मुलगी सोमवरगिरी मढी या परिसरातील आहे. अशे 5 महिला व 1 पुरुषांचा समावेश आहे. आज सकाळी एक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता आजच पुन्हा 6 बाधित आढळल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सदरील घटनेने सावदा शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढीस येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता नागरिकांना आणखी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. तरी रुग्णांचा रहिवास असलेला काही परिसर प्रशासनाकडून आधिच सिल असुन पाटीलपुरा परिसर सिल करण्यात येत आहे. सदरील घटनेने परिसराच्या व सावदा वासीयांना पुन्हा चिंतेत टाकले आहे. सदरील वृत्तास नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.

सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 45 झाली असुन त्यात 7 मयत, 9 उपचार घेत आहे व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!