भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

सावधान ! आता कोरोनाचा हवाई हल्ला, रुग्ण संख्या वाढीच कारण…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (विशेष प्रतिनिधी )कोरोना रुग्ण वाढीच फार मोठं करणं आता समोर येत आहे,कोरोनाच्या लक्षणांमध्ये अचानक झालेल्या बदलामुळे कोरोना आता हवेतून पसरू लागला आहे. कोरोनाच्या हवाई हल्ल्यामुळेच , त्याच बरोबर नागरिकांचा बेजबाबदार पणा,परिणामी या मुळेच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याच मत कोरोना संबंधित टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या वर्षांभरापासून कोरोनाने मुक्काम ठोकला असून, जायचं नावच घेत नाहीय .फेब्रुवारीच्या सुरुवात पर्यंत कोरोनावर आरोग्य यंत्रणेने चांगल्या प्रकारे उपाययोजना करून नियंत्रण मिळवले होते. मात्र त्या नंतर अचानकपणे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि कोरोनाच्या लक्षणांतही बदल झाला.आता कोरोना हवेमधून पसरू लागला आहे. कोरोनाच्या हवाई मार्गाच्या हल्ल्याने एकाच वेळी अनेकांना या कोरोनाची बाधा होत आहे.परिणामी रुग्ण संख्येत फार मोठी वाढ झाली आहे.” काय होतं” असं म्हणत नागरिकांच्या बेफिकिरीपणाने कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला निमंत्रणच दिले आहे.त्यामुळेच महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे कोरोनाचे ‘बदललेले स्वरूप’ हेच खरे कारण आहे. ‘डबल म्युटन स्ट्रेन’मध्ये सुरुवातीचे ५ ते ७ दिवस बाधितामध्ये कोरोनाची लक्षणेच दिसत नाहीत.केवळ जवळच्या संपर्कातून पसरणारा कोरोना आता हवेतूनही जलद गतीने पसरत असल्याने दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, व मृत्यचे प्रमाणही वाढले आहे ,असे मत राज्य सरकार नियुक्त कोरोना संदर्भातील टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केले.

कोरोनाचा स्ट्रेन वर्षभरात कमालीचा बदलला आहे. आता रुग्णांमध्ये पहिल्या आठवड्यात लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे रुग्ण बाधित असूनही गर्दीत राहिल्याने इतरांनाही त्याची लागण होऊन रुग्ण संख्या वाढत आहे. संपूर्ण कुटुंबही बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला केवळ खोकला, शिंका, थुंकी, निकट संपर्क, रुग्णाच्या संपर्कातील वस्तूवर विषाणू राहिल्याने कोरोनाची लागण होत असे ; मात्र आता सुरुवातीच्या कारणांसोबतच कोरोनाचा हवेतून प्रसार होऊ लागल्याने एकाच वेळी अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. लोक वेदनाशामक गोळ्या घेतात, चाचण्या करण्याकडे दुर्लक्ष करतात. लक्षण दिसत असतानाही इतरांपासून लपविण्याचा प्रयत्न केला जातो,आणि यामध्ये आजाराची तीव्रता वाढते आणि अनेकांना लागण ही होते, असे टास्क फोर्सच्या सदस्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!