भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयताज्या बातम्या

सैनिकी हल्ल्यानंतर भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी चीनचा ड्रॅगनचा नवा डाव

भारत चीन तणाव : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांकडून झालेल्या विश्वासघातकी हल्ल्यानंतर आता चिनी हॅकर्सकडून भारताला सायबर हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘डार्क वेब’वर ‘भारताला धडा शिकवण्याच्या’ वल्गनाही दिसल्या.

नवी दिल्ली ।

लडाखमध्ये सुरू असलेल्या भारत आणि चीन यांच्यामधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता चिनी हॅकर्सच्या गटांकडून भारतावर लडाखमध्ये सुरू असलेल्या भारत आणि चीन यांच्यामधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता चिनी हॅकर्सच्या गटांकडून भारतावर सायबर हल्ला होण्याची भीती व्यक्त होत आहे. चिनी हॅकर्सच्या या गटांकडून दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय सरकारी वेबसाइट आणि कॉर्पोरेट कंपन्या, प्रसारमाध्यमे, औषध कंपन्या, टेलिकॉम ऑपरेटर आणि भारतातील एक प्रसिद्ध टायर कंपनी यांच्यावर सायबर हल्ला करण्यात येऊ शकतो, असा इशारा सिंगापूर येथील सायबर गुप्तचर कंपनी ‘सायफार्मा’ने दिली आहे. या चिनी हॅकर्सच्या गटांचा चीनच्या सरकार आणि लष्कराशी संबंध असल्याचेही ‘सायफार्मा’ने स्पष्ट केले आहे.

दहा दिवसांपूर्वी चिनी हॅकर्सचे गट ‘डार्क वेब’वर आपापसात ‘भारताला धडा शिकवणार’ असल्याची चर्चा करीत होते. तसेच दूरसंचार, औषधे, स्मार्टफोन आणि बांधकाम उद्योगांमधील संवेदनशील डेटा चोरी करणे, सेवा नाकारणे किंवा संबंधित वेबसाइटला अपमानित करणे किंवा भारत सरकारच्या वेबसाइट आणि कॉर्पोरेटना लक्ष्य करीत फिशिंग मोहिमा सुरू करणे आदी योजना या गटांनी आखल्या आहेत, असेही ‘सायफार्मा’ने म्हटले आहे.

या सायबर हल्ल्यात सर्वाधिक धोका भारतातील प्रसारमाध्यमांना असल्याचे ‘सायफार्मा’ने म्हटले आहे. चिनी सायबर हल्लेखोरांच्या हॅकिंगच्या यादीत भारताच्या संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह जिओ, एअरटेल, एल अँड टी, अपोलो टायर्स, मायक्रोमॅक्स आणि सिप्ला या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच देशातील सायबर संकटांशी लढणारी भारतीय नोडल संस्था ‘सीईआरटी-इन’चेही नाव या यादीत आहे.

‘सायफार्मा’चे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार रितेश यांनी सांगितले की, या हॅकिंग गटांमधील संभाषणामध्ये शेअर करण्यात आलेल्या आयपी अॅड्रेसचे विश्लेषण केले असता, गोथिक पांडा आणि स्टोन पांडा हे दोन हॅकर गट यामागे असल्याचे समोर आले आहे. यांचा थेट संबंध हा चीनच्या लष्कराशी आहे. हे दोन्ही गट चिनी सरकारसाठी काम करतात. हे अमेरिका आणि हाँगकाँगवरही सायबर हल्ले करीत असतात. अलीकडेच ऑस्ट्रेलियातील सरकारी आणि खासगी क्षेत्रांवरही मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ला करण्यात आला होता. चीनवरच या हल्ल्यांचा संशय व्यक्त केला जातो.

जाणून घेऊ डार्क वेब म्हणजे काय ?

डार्क वेब म्हणजे, ज्या ठिकाणी हॅकर्सचा समुदाय गुप्तपणे राहून आपले काम करीत असतो. यांचे संभाषण हे सांकेतिक भाषेत सुरू असते.

यांना वर्तविला धोका…

‌- दूरसंचार क्षेत्रात कार्यरत भारतीय सरकारी वेबसाइट

– कॉर्पोरेट कंपन्या

– मीडिया हाऊस

– औषध कंपन्या

– टेलिकॉम ऑपरेटर

– एक प्रसिद्ध टायर कंपनी

चीन हॅकर्सची योजना काय आहे ?

– संवेदनशील डेटा चोरी करणे

– संबंधित वेबसाइटला अपमानित करणे

– सेवा नाकारणे

– भारत सरकारच्या वेबसाइट्स आणि कॉर्पोरेट्सना लक्ष्य करीत फिशिंग मोहिमा सुरू करणे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!