स्मार्ट ग्राम चिनावलच्या सरपंच भावना बोरोले यांना राज्यस्तरीय नारी रत्न पुरस्कार जाहीर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चिनावल प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारिदिप सन्मान २०२१ पुरस्कारांची घोषणा काल सावित्रीबाई फुले पुण्यतिथी रोजी करण्यात आली.यामध्ये रावेर तालुक्यातील स्मार्ट ग्राम म्हणून नुकतीच निवड झालेल्या चिनावल गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.भावना योगेश बोरोले यांना राज्यस्तरीय नारी रत्न पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे.
खान्देश जनसेवा फाऊंडेशन व खान्देश न्युज नेटवर्क यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा काल सायंकाळी करण्यात आली.चिनावल येथे महिला सरपंच म्हणून सौ.भावना बोरोले यांनी केलेली विविध विकासकामे, गाव स्वच्छ,सुंदर व प्रगत करण्यासाठी त्यांनी आजपर्यंत राबविलेले उपक्रम या सर्व बाबींची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या निवडीबद्दल सौ.भावना बोरोले यांचे विविध पदाधिकारी व मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.