भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयप्रशासनसामाजिक

मोठी बातमी; केंद्राने खुल्या धान्यांसह अनेक गोष्टींवरचा जीएसटी घेतला मागे

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्र सरकारने सुट्या धान्यांसह अनेक गोष्टींवर पाच टक्के जीएसटी आकारला होता. यावर आता केंद्रीय अर्थछमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून हा जीएसटी मागे घेत असल्याचे म्हटले आहे. यानुसार सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाहीय.

गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू दही, लस्सी सारख्या गोष्टींवर जीएसटी लावल्यामुळे केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. २५ किलो वजनाच्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आला होता. याची अंमलबजावणी १८ जुलैपासून झाली होती. यामध्ये अनेक वस्तूंचा जीएसटी देखील वाढविण्यात आला आहे. यामुळे अनेक वस्तू, खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. आधीच महागाई असताना केंद्राने जुलमी जीएसटी लावल्याने जनतेत रोष निर्माण होऊ लागला होता. त्यामुळे केंद्राने खुल्या धान्यांसह अनेक गोष्टींवरचा जीएसटी मागे घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!