राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी, “ते” १६ आमदार अपात्र होणार?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेच्या १६ आमदारांच्या पात्र आणि अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीशी संबंधित सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याची ठाकरे गटाची मागणी होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुपारी २ वाजता ही सुनावणी होणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
१६ आमदारांच्या अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज सुनावणी होणार आहे. तर शिंदे -ठाकरे खटल्याप्रकरणातील नबाम रेबिया केसवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे
७ न्यायामूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. आधी ही सुनावणी पाच न्यायामूर्तींच्या खंडपीठासमोर झाली होती. नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यासाठी ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आपला जुना निर्णय बदलणार की निर्णय कायम ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.