….तर कोरोनाचे रौद्र रुप लवकरच दिसणार; कोरोना विषाणूंबाबत WHO चं मोठं विधान
कोरोना माहामारीचे रौद्र रुप पाहायला मिळू शकते.
नवी दिल्ली:
कोरोना व्हायरसचं संक्रमण वेगाने पसरत आहे. जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतातील रुग्णांची संख्या ५ लाखांपेक्षा जास्त आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने मोठं विधान केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेतील तज्ज्ञ टेड्रोस यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना माहामारीचे रौद्र रुप पाहायला मिळू शकते. जर नियमांचे पालन केले नाही तर हा व्हायरस लोकांना मोठ्या प्रमाणात संक्रमित करू शकतो. या माहामारीला हरवण्यासाठी एकजुटीने आपण सगळ्यांनी नियमांचे पालन करायला हवे.
याव्यतिरिक्त तज्ज्ञांनी सांगितले की, ६ महिन्यांआधी ही माहामारी रौद्ररुप धारण करेल याबाबत अंदाजही नव्हता. कोरोनामुळे लोकांना आपापाल्या घरी बंद ठेवावं लागेल. जग एका वेगळ्यात वळणावर असेल अशी कल्पनाही केली नव्हती. WHO च्या इमेरजेंन्सी प्रोग्रामचे प्रमुख डॉक्टर मायकल रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार या माहामारीतून मार्ग काढण्यासाठी भेदभावाची भावना लोकांमधून नष्ट व्हायला हवी. सगळ्यांनी मिळून कोरोनाची माहामारी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
टेड्रोस यांनी सांगितले की, काही देशांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी झाला असला तरी जागतिक स्तरावर ही माहामारी वाढत आहे. जगभरात आत्तापर्यंत कोरोना व्हायरसच्या ८० हजार ते १ लाखांपर्यंत केसेस समोर येत होत्या. गेल्या काही दिवसात रोज दीड लाखांपेक्षा जास्त केसेस समोर येत आहेत. अमेरिका, ब्राझिल आणि भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिका आणि ब्राजिलमध्ये रोज जवळपास ३० हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण समोर येत आहेत.
दरम्यान दिवसागणिक कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यातच आता कोरोनाची आणखी तीन लक्षणं आढळून आली आहेत. कोरोनाची बाधा झाल्यास सर्दी, उलट्या, अतिसाराचा त्रास होतो. मात्र यात आणखी तीन लक्षणांची भर पडली आहे. अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं तीन नव्या लक्षणांचा समावेश केला आहे. त्यात नाक गळणं, पोटात ढवळणं, उलट्या यांचा समावेश आहे. याआधी कोरोनाची ९ लक्षणं आढळून आली आहेत. त्यात ताप, सुका खोकला, श्वासोच्छवासात अडचणी, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, तोंडाची चव जाणं, घशात खवखव यांचा समावेश आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा