भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

निंभोरा स्टेशन येथील १ अहवाल कोरोना बाधित !

निंभोरा (प्रतिनिधी)।  येथील कोरोना तपासणी अहवाल निंभोरा सेंटरला आज प्राप्त झालेले असून अहवालांमध्ये  निंभोरा स्टेशन येथील १ अहवाल कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आज स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालेल्या गावांतील कोरोना तपासणी अहवालात निंभोरा स्टेशन येथील एका ३९ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने गावकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गावांतील आजवर एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ४५ झाली आहे, त्यातील ८ रुग्ण उपचार घेत असून ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्याचे दिसत असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदरील वृत्तास वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन पाटील यांच्या कडुन दुजोरा मिळाला आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!