कत्तल करण्यासाठी बांधुन ठेवलेल्या गाय आणि वासराची सुटका
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा येथील ख्वाजानगर परिसरात निमजायमाता मंदिर रोडवरील एका गोठ्यात दि. ११ मे २५ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आरोपी शेख रसुल शेख चांद कुरेशी (रा. सावदा) याने दोन गायींना क्रूरपणे बांधून कत्तल करण्याच्या उद्देशाने गोठ्यात ठेवल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला .
आरोपीने ५०,००० रुपये किमतीची जर्सी संकरित जातीची गाय (वय ८-९ वर्षे, डाव्या कानावर टॅग क्र. १०२५३२९०७३४७, पांढऱ्या रंगावर काळे ठिपके) आणि १०,००० रुपये किमतीचे होल्स्टेन संकरित जातीचे वासरू (वय १-२ वर्षे, पांढऱ्या रंगावर काळे ठिपके) यांना आखूड दोराने क्रूरपणे मान आणि पाय बांधून गोठ्यात डांबले होते. या गायींची एकूण किंमत ६०,००० रुपये आहे. आरोपीचा हेतू कत्तल करण्याचा होता, या संदर्भात सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलेश जगतराव बाविस्कर (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्र. १२५/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम-१९७६ (सुधारणा २०१५) चे कलम ५(अ), ५(ब), ९, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम-१९६० चे कलम ११(१)(च) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ चे कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे करीत आहेत.

