यावल येथील शेतकऱ्याची फसवणूक, केळी व्यापार्या विरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित.
यावल (सुरेश पाटील)। यावल येथील शेतकऱ्याची मध्यप्रदेशातील केळी व्यापाऱ्याकडून 2 लाख 15हजारात फसवणूक प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यावल येथील केळी उत्पादक शेतकरी किशोर देवराम राणे वय 45 धंदा शेती रा.महाजन गल्ली यावल ता यावल जि जळगाव मी फिर्याद दिली की आरोपी लिलाधर प्रल्हाद पाटील तत्कालीन रा.वार्ड नं. 22 सिंधीपुरा गेटजवळ बुरहानपुर ह.मु गुजरगल्ली बहादरपुर ता.जि.बुरहानपुर अ.घ.ता वेळ ठिकाण – 02/12/2018 व दिनांक 07/12/2018 रोजी यावल शिवारातील फिर्यादीचे मालकिचे शेतगट नं 1006 व 1922 या शेतांमध्ये केळी खरेदी करुन केळी खरेदीचे पैसे न देता फसवणुक केली खुलासा असा की फिर्यादीची फिर्याद कि वरिल ता वेळी व जागी यातील आरोपी याने फिर्यादिचे मालकिचे शेतातुन 2 लाख 15 रु. किंमतीची 181 क्विंटल 55 किलो वजन असलेली केळी विकत घेवुन त्या केळीचे पैशांचे मोबदल्यामधे 2,15,000 / – रु.चा.चेक दिला असता सदर आरोपीच्या खात्यामधे पैसे नसल्याने सदरचा चेक वटविला न गेल्याने फिर्यादी याने आरोपी यास वारंवार 2 लाख पंधरा हजार रुपये मागणी केली असता आरोपी केळी व्यापारी याने फिर्यादी शेतकऱ्यास पैसे देत नाही तुझ्याने जे होईल ते करुन घे तुझ्यात ताकद असेल तर पैसे वसुल करुन दाखव असे म्हणुन पैसे देण्यास,नकार देवुन शेतकऱ्याची 2 दोन लाख पंधरा हजार रुपयाची ची फसवणुक केली.या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध फसवणुकीचा भाग5 गु.र.न. 158/2020 भादवी कलम 420 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे आदेशान्वये पो.हे.कॉ.560 नितीन चव्हाण हे करित आहे.
केळीचे व्यापारी हे शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करताना कायदेशीर रित्या शेतकऱ्यांना पक्के बिल न देता, कॅश पेमेंट न देता, किंवा बँकेचा धनादेश न देता शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत असून अनेक शेतकऱ्यांची लाखो रुपयात आर्थिक फसवणूक करीत आहे याकडे संपूर्ण शासकीय यंत्रणेसह आयकर विभाग यांचे दुर्लक्ष होत असल्याने केळी व्यापारी आणि केळी उत्पादक शेतकरी यांचा समन्वय साधणे कामी लोकप्रतिनिधींनी यांनी ठोस निर्णय घेऊन केळी मालाचे पेमेंट सुरक्षित राहणे कामी तात्काळ कायदेशीर मार्ग काढावा तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाल्यास फसवणुकीच्या घटनांना मोठा आळा बसेल असेसुद्धा संपूर्ण यावल रावेर तालुक्यातील नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.