रावेर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्येने ५५०चा आकडा ओलांडला !
रावेर (प्रतिनिधी)। आता नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार तालुक्यात आता पर्यंत तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये १३ अहवाल बधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत.
प्रशासनाला प्राप्त आज आलेल्या अहवालामध्ये रावेर शहर ४, निरुळ २, लूमखेडा,सावदा,निंभोरा,मोरगाव, विवरा, वाघोड, कुसुम्बा बु.-प्रत्येकी १ अशे रुग्णांचे अहवाल तालुका प्रशासला बाधित आढळून आल्याचे प्राप्त झाले आहे. तालुक्यात बाधितांची दिवसागणित वाढती संख्या चिंतेत भर घालणारी असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तालुक्यात बधितांची संख्या ५५२ झाली आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे