अरे बापरे: जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा तब्बल २०९ रुग्ण कोरोना बाधित !
जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात तब्बल २०९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २०९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक जळगाव शहरातील ५५, भुसावळ १८, अमळनेर ८, चोपडा ११, पाचोरा ०१, भडगाव १३, धरणगाव ६, यावल ११, एरंडोल २८, जामनेर ७, जळगाव ग्रामीण १३, रावेर १०, पारोळा २२, चाळीसगाव ०४, मुक्ताईनगर ०१, बोदवड १, दुसर्या जिल्ह्यातील-० जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या चार हजाराच्या वर गेली आहे. सद्यस्थितीत १४२० रुग्ण कोविड १९ उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.
आजच्या जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ४००७ इतकी झालेली आहे