भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

आईची आभाळमाया! आई शेवटी आईच असते : पोटच्या तीन मुलांसाठी ‘आई’ कोविड सेंटरमध्ये

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पुणे (विशेष प्रतिनिधी)। आईची तुलना आपण कोणा सोबतही करू शकत नाही आई मुलांसाठी केव्हा काय-काय करू शकते ,स्वत:पेक्षाही जी आधी मुलांचा विचार करते त्या आईची माया कोरोनाच काय कोणीही रोखू शकणार नाही.कोरोनाच्या या संकटाने अनेक नात्यांतील खोटेपणा समोर आणला. मात्र आईचं मुलांप्रतीचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही आणि ते कधीच होऊ शकणार नाही,आपल्या चुकांवर पांघरून घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणा सोबतही होऊ शकत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे आईने आपल्या मुलांसाठी स्वतःच जीव धोक्यात घातला.

साध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर सुरू असून सर्वत्र हाहाकार मजला आहे अशातच पुण्याहून गावाकडे परतलेल्या एका कुटुंबाला कोरोनाचा विळखा बसला, कुटुंबातील तीन मुलांसह वडिलांना कोरोनाची लागण झाली परन्तु यात सुदैवाने आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह निघाला. तीन मुलांपैकी एक तर ७ महिन्यांचा मुलगा होता. त्या चारही जणांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची तयारी सुरू झाली. आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी ती आपल्या लेकरांसाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झाली.सध्या हे कुटुंब शहरातील ईदगाह कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. निलंगा तालुक्यातील एका गावात राहणारं हे कुटुंब पुण्यात कामासाठी वास्तव्यास आहेत. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या कुटुंबाने आपल्या गावी उमरग्यात जाण्याचा निर्णय घेतला. येथे परतल्यानंतर पतीला अस्वस्थ वाटू लागलं. त्यांची चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सात महिन्याचे बाळ, दोन मुलींसाठी स्वात:निगेटिव्ह असलेली आई कोविड सेंटर येथे राहून गरजेनुसार सुरक्षितता बाळगून बाळासोबत राहून आपल्या लेकरांच्या सांभाळ करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!