भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

महापालिका उपायुक्त ७ लाख रुपयांची लाच प्रकरणी एसीबी च्या जाळ्यात

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सात लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले असून सात लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी उपायुक्त वैभव साबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिका क्षेत्रातल्या एका २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी १० लाख रुपयांच्या लाच मागितली व सात लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीला माहिती दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराच्या सांगण्यावरुन सापळा रचण्यात आला.

तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उपायुक्तांनी सात लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीने उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला. महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!