भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

घरकुल साठी जागा नसलेल्याना शासनाकडून मोठा दिलासा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

कोरपावली ता,यावल(प्रतिनिधी)। अनेक वर्षांपासून जागे अभावी वंचीत असलेल्याना शासनाकडून मोठी तरतूद करण्यात आल्याची माहिती यावल पंचायतीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी आयोजित सभेत सांगितले, 2016 ते 17 या वर्षाच्या कार्यकाळात घरकुलाची संख्या 6529 होती तर त्यातील 2699 लाभार्त्यांकडे जागा उपलब्ध नसल्याने योजनेचा लाभ घेण्या पासून वंचीत होते आता शासनाने लाभार्थ्यांस जागा घेण्यासाठी 50 हजाराची तरतूद करण्यात आली आहे असा प्रस्ताव समबंधीत ग्रामपंचयत ग्राम सेवकांनी पंचायत समिती कडे सादर करावा अशी सूचना देण्यात आली त्या प्रसंगी ग्राम विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रुबाब तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व सम्पूर्ण ग्रामसेवक वर्ग सभेस उपस्थितीत होते,

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!