चिनवलात एक व कोरोना मुक्त झालेल्या मोठा वाघोदा गावात पुन्हा एक रुग्ण कोरोना बाधित !
चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी)। चिनावल गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे. तर मोठे वाघोदे गाव कोरोना मुक्त झाले होते. मात्र आज आलेल्या अहवालात दोन्ही गावातील प्रत्येकी 1 रुग्ण बाधित आढळुन आल्याचे निष्पन्न झाले आहे. आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील एक 30 वर्षीय वान गल्ली परिसरातील रहिवासी पुरुष रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल बाधित आढळून आला आहे.
चिनावल गावांतील कोरोना बाधित रुग्ण संख्या 36 असुन त्यात 2 मयत आहेत तर काही कोरोनाला मात देत घरी परतले आहेत.
तर मोठे वाघोदे येथे आधी 13 रुग्ण बाधित आढळून आले होते ते सर्व रुग्ण कोरोनाला हरवत घरी परतले होते म्हणुन मोठे वाघोदे कोरोना मुक्त झाले होते परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कोरोनाने पुन्हा प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. आज मोठे वाघोदे गावातील 53 वर्षीय वार्तालाब चौक परिसरातील पुरुष बाधित आढळून आला आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरटाइन करण्यात आले असुन सदरील वृत्ताने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे