भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

जळगांव जिल्ह्यात आज आणखी १५६ रुग्ण बाधित

जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात १५६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल १५६ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ५६ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत तर याच्या खालोखाल जळगाव ग्रामीणी १८, जामनेर १३, रावेर व भुसावळ प्रत्येकी १२, अमळनेर ७, चोपडा ८, पाचोरा ४, भडगाव ३, धरणगाव ७, यावल ३, एरंडोल १, मुक्ताईनगर १०, बोदवड १, इतर जिल्ह्यातील १ अशी रूग्णसंख्या आहे

जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधित रूग्ण ४ हजार ५८६ रूग्ण झाले आहे. त्यापैकी २ हजार ७१७ रूग्ण बरे होवून घरी पाठविले आहे. एकुण २८२ जणांचा मृत्यू झाला असून १ हजार ५ ८७ रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!