जळगावताज्या बातम्यासंपादकीय

संपादकीय…रावेर,यावल,सावदा,फैजपूर या शहरातही लॉकडाऊन ची आवश्यकता………..

मुख्य संपादक- भानुदास भारंबे

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भावामुळे जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात पुन्हा lockdown ला सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. आपल्या रावेर-यावल तालुक्यातील रावेर, यावल, सावदा, फैजपूर या चारही शहरात lockdown लावण्याची परिस्थिती फार लांब नाही?…महाराष्ट्रातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यासह रावेर, यावल याशहरासह फैजपूर,सावदा या शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे या पेक्षाही भयंकर परिस्थिती यावल तालुक्यातील साकळी या गावाची आहे. एकंदरीत परिस्थिती विचार करायला लावणारी आहे.
अजुनही शहरातील अनेक नागरिक ‘मले काय हूइन पाही घीव?’ या आविर्भावात वावरतांनाचे चित्र दिसत आहेत तर शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची संख्याही खुप आहे. अजुनही अनेक व्यापारी व व्यावसायिक बांधव सावध झालेले नाहीत. त्यांच्या मते फिजिकल डिस्टनसिंग, मास्क, sanitizer ह्या बाबी फक्त प्रशासनाला दाखवण्यासाठी , कोरोना पासून नाही तर दंडापासून वाचवण्यासाठी आहे. यावल रावेर तालूक्यातील चारही शहरात कोरोनाची half century झालेली आहे, पन्नाशी गाठली आहे. ग्रामीण भागात म्हणजेच खेड्या पाड्यात सुद्धा कोरोना ने शिरकावच नाही तर हातपाय पसरवत आपला चांगलाच प्रभाव दाखवत असतांना चे वास्तव भयावह आहे. एकंदरीत कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेतले जाणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अश्या परिस्थितीत आपण सावध झालो नाही तर आपल्या साठी ही धोक्याची घंटा असेल……”संत-महंत, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, किरकोळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते तथा प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार यांना विश्वासात घेऊन उपविभागीय अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासन यांनी यावल,रावेर तालुक्यातील जनतेचा कोरोना पासून बचाव होण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. योग्य वेळी योग्य पाऊल उचलले तर त्याचा सर्वांना फायदाच होईल. प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य असूनही बरेच लोक ते वापरत नाही. तर काही लोक शो म्हणून फक्त गळ्यात लटकवितांना दिसतात. नियमाचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी. अरेरावी करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे दाखल करावे. कोरोना कोणाच्याही घरात सांगून येणार नाही. आपण वेळीच दखल घेतल्यास अनेकांचे प्राण वाचतील. स्वयंशिस्त हाच एक सर्वात मोठा पर्याय आहे त्या मुळे प्रत्येकाने स्वयंशिस्तीचे पालन केले पाहिजे आपण सर्वांनी एकजूट केल्यास कोरोना युद्ध नक्कीच जिंकू…

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!