जळगाव जिल्ह्यात आज ५१५ रुग्ण बरे; नविन ६९६ कोरोना बधित !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ६९६ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव आणि अमळनेर तालुक्यात आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक १६९ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल १४२ रूग्ण हे अमळनेर तालुक्यातील आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, रावेर २७, जळगाव ग्रामीण ५९, पारोळा ५९, जामनेर ३७, पाचोरा १२, भुसावळ २६, अमळनेर ७, चोपडा ७८, भडगाव १२, धरणगाव २२, यावल ११, एरंडोल ५, चाळीसगाव २७, मुक्ताईनगर ८, बोदवड ३, अन्य जिल्हा १ असे रूग्ण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा २७१३५ इतका झालेला आहे. यातील १९२१३ रूग्ण बरे झाले आहेत. आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ८०६ इतकी तर उपचार घेत असलेले ७११६ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.