भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्या

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची गुरुवारी जळगाव आकाशवाणी केंद्रावर मुलाखत

कापूस, केळी व कविता पीकविणाऱ्या आपल्या जिल्ह्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या भावना ऐकायलाच हव्यात..


जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना व जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देणारी जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन गुरुवार, दि. 25 जून, 2020 रोजी सकाळी ठिक 7:25 वाजता प्रसारित होणार आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा संशयित रुग्ण शोध पंधरवडा, कोरोनाला रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘थ्री टी’ (Trecing, Teasting, Treatment) चा करण्याचात येणारा अवलंब, मृत्युदर कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्यावंर होणारी दंडात्मक कारवाई, स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचा सहभाग व त्यांच्या मदतीसाठी केलेले आवाहन, जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी व खबरदारी यासह कापूस, केळी व कविता पीकविणाऱ्या जळगाव जिल्ह्याविषयी आपल्या भावना या मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत.

ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे. तरी जिल्हावासियांनी ही मुलाखत गुरुवार, 25 जून, 2020 रोजी सकाळी ठिक 7.25 मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणी केंद्रावर ऐकायला विसरु नये. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

न्हावी-फैजपुर परिसराच्या शेतशिवारात सामूहिक अत्याचाराच्या चर्चेला उधान !

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!