न्हावी-फैजपुर परिसराच्या शेतशिवारात सामूहिक अत्याचाराच्या चर्चेला उधान !
फैजपुर ता.यावल (विशेष प्रतिनिधी) । यावल तालुक्यातील न्हावी-फैजपूर दरम्यानच्या शेतशिवारात गेल्या काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार होऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून या अत्याचाराच्या चर्चेला यावल तालुक्यासह संपूर्ण फैजपूर परिसरात आता उधाण आलेले आहे. सदर प्रकरणं एका मध्यस्ती च्या वतीने ऐनतेन प्रकारे दबाव आणुन मिटवल्याची चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र ऐकायला मिळत आहे. सदरील घटना ही एका प्रेमीयुगुलाशी संबंधित असून चार तरुणांनी त्या पीडीत अल्पवयीन मुलीला चारचाकीने फैजपूर न्हावी दरम्यानच्या शेत शिवारात एका शेतात खोलीत जबरदस्तीने नेऊन त्या मुलीला बदनामीची व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तीला शीतपेयामध्ये अमली पदार्थ पाजून तिच्यावर त्या ठिकाणी सामूहिकरीत्या अत्याचार करण्यात आलेला असल्याची चर्चा सुरू असून सदरील मुलगी ही यावल तालुक्यातील फैजपुर येथील असल्याची चर्चा असून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा संपूर्ण परिसरात आता जोर धरू लागली आहे…………..!
Pingback: भारताच्या 'या' कारवाईने पाकिस्तानचा थयथयाट! | मंडे टू मंडे
Pingback: नऊ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार- आरोपीस अटक | मंडे टू मंडे
Pingback: फैजपुर येथिल पुन्हा एकाच घरातील 3 जणांना कोरोची बाधा ! | मंडे टू मंडे
Pingback: धक्कादायक! मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात शिकाऊ महिला डॉक्टरचा वॉर्डबॉयकडून विनयभंग | मंडे टू मंडे