भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत २ लाखांच्या ऐवजासह १९ जण ताब्यात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नवी पेठ भागातील जुनी बॉम्बे लॉजिंगच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सोमवारी रात्री धाड टाकून १९ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान घटनास्थळावरून २ लाख १० हजार ९४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकातील प्रो.डीवायएसपी नितीन गणपुर, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मोतीराया, सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, पोलीस कॉन्स्टेबल अशोक भुसे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, शहरातील जुने बॉम्बे लॉजिंग बेसमेंटमध्ये हारजीतवर जन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ सुरू आहे. या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने रात्री आठ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी विकास रमेश सोनवणे (रा शनिपेठ), फिरोज गुलाब पटेल (रा संदांशिव नगर), हेमंत रमेश शेटे (रा.कांचन नगर), अनिल रामभाऊ खाडेकर (रा.शिवाजीनगर) अशोक ओंकार चव्हाण (रा.केसी पार्क), घनश्याम लक्ष्मणदास कुकरेजा (रा.सिंधी कॉलनी), अनिल भिमराव ढेरे (रा.लक्ष्मीनगर) पंढरी ओमकार चव्हाण (रा.त्रिभुवन कॉलनी), रायचंद लालचंद जैन (रा.गणपती नगर जळगाव रोड, जामनेर), रामदास दगडू मोरे (रा.शाहूनगर), नितीन परशुराम सूर्यवंशी (रा. हरीओम नगर), नजीर शफी पिंजारी (कोळी पेठ), पंकज वामन हळदे (चौगुले प्लॉट, शनिपेठ) आसिफ अहमद खाटिक (रा.पिंप्राळा हुडको ),ब्रिजलाल आनंदराम वालेचा (रा.लक्ष्मी नगर पंचमुखी हनुमान मंदिराजवळ), मोहम्मद सलीम मोहम्मद इस्माईल (रा.इस्लामपुरा भवानीपेठ), सलीम खान मुसाखान (रा.शिवाजीनगर), नूरा गुलाम पटेल (रा.सुरेशदादा जैन नगर), पवन गुरुदासराम लुल्ला (रा.सिंधी कॉलनी) अशांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. या सर्व जणांकडून रोख रुपये, मोबाईल मोटारसायकल तसेच जुगाराचे साहित्य मिळून आले. यासंदर्भात मुंबई जुगार कायदा कलम ४५ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २,३,४ चे उल्लंघन करून लॉकडाउनच्या नियमांचे पालन न करता कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढेल असे वृत्त केले म्हणून १८८, २६९, २७०, या कलमान्वये पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!