भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

ठेव पावत्याची मुदत संपल्याचे कारण दाखवत निवडणूक अर्ज केला बाद-जळगाव पीपल्स बँक निवडणूक.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। येथील जळगाव पीपल्स सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी आपण आधीच या प्रक्रियेवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून या प्रकरणी ३ मे रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती उमेदवार चंद्रशेखर देवीदास अत्तरदे यांनी ” मंडे टू मंडे” शी बोलताना दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव पीपल्स को ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूकीसाठी १४ जागांसाठी २७ सभासदांनी नामनिर्देशन पत्र घेतल्यावर २४ सभासदांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. नामनिर्देशनपत्रांची छाननीमध्ये ९ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. तर, एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने १४ उमेदवारांचे अर्ज बाकी राहिल्याने सदर १४ उमेदवार बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज ऑनलाइन सभेमध्ये जाहीर केले. बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांची २०२१-२०२६ या कालावधी करिता निवडणूक प्रक्रिया सहकारी संस्था सांगली जिल्हा उपनिबंधक एन. डी. करे यांच्याकडून राबविण्यात आली. या निवड प्रक्रियेमध्ये भालचंद्र पाटील, प्रकाश कोठारी, चंद्रकांत चौधरी, सुनील पाटील, रामेश्‍वर जाखेटे, प्रविण खडके, ज्ञानेश्‍वर मोराणकर, अनिकेत पाटील, चंदन अत्तरदे, विलास बोरोले, सुहास महाजन, स्मिता पाटील, सुरेखा चौधरी, राजेश परमार यांची निवड बिनविरोध करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

निवडणूक अर्ज बाद झालेल्या मध्ये चंद्रशेखर देवीदास अत्तरदे याचाही अर्ज बाद झालेला असून
चंद्रशेखर देदिदास अत्तरदे यांचे असे म्हणणे आहे की दर पंच वार्षिक निवडणुकीच्या वेळी निवडणूक अधिकारी एन. डी. करे यांचीच कशी निय्युक्ती केली जाते ,त्यांनी मागच्या पंचवार्षिक वेळी माझ्या निवडणुकीच्या नाम निर्देशन पत्रा वेळी ठेवीच्या पावत्या नूतनीकरण एक वर्षापासून केले आहे असे जाहीर केले, परंतु ती पावती जुनी आहे असे म्हणून ग्राह्य केले नहीं व या निवडणुकीच्या वेळी, मुदत ठेव पावती असताना, ठेव पावत्यांची मुदत दोन वर्षा पासून संपली असल्याचे कारण देत , असे सांगून माझा निवडणूक अर्ज बाद केला,पावती तर आता बँक स्वयं नूतनीकरण होते अगोदर पासून करत आहे असे जाहीर केले आहे ,पावती नूतनीकरण होते तर अर्ज बाद झाला कसा,असे अत्तरदे यांनी प्रश्न केला असून असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून याबाबत आधीच उच्च न्यायालयात धाव घेतलेले चंद्रशेखर देवीदास अत्तरदे यांनी ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात आपण या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल ( याचिका क्रमांक ६१५३/२०२१ )केली असून यावर ३ मे रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे हायकोर्टातील सुनावणी नंतरच या निवडणुकीबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.आता न्यायालय यावर काय निर्णय देते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!