धक्कादायक: सावद्यात सकाळी कोरोना बाधित आलेल्या रुग्णांचा मृत्यू !
सावदा (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सावदा शहरातही सुरवतीला कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता. मात्र दिलासादायक बाब बऱ्याच दिवसांपासून शहरात बाधित रुग्ण आढळून आला नव्हता परंतु आज आलेल्या माहिती नुसार आज सकाळी पुन्हा एका 54 वर्षीय पुरुषाचा खाजगी अहवाल बाधित आला नंतर सदरील बाधित रुग्ण 9:50 ला मृत्यू पावल्याने परिसरात चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे. सदरील रुग्ण धान्य मार्केट परिसरातील निमजाय माता नगर येथील रहिवासी आहे. सदरील घटना घडल्याने परिसरात चिंता पसरली आहे तर संपर्कातील 22 व्यक्तींना कॉरंटाइन केले गेले आहे तर परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. आता शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्या 13 झाली असुन सदरील वृत्तास गोदावरी कोविड सेंटर जळगाव यांच्या कडून दुजोरा मिळाला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 50 झाली असुन त्यात 9 मयत तर 11 उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला हरवत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.