नगरसेवक शेख कुर्बान याच्या हस्ते फैजपुरात कुष्ठरोग शोध मोहीमेचे उद्घाटन
फैजपूर ता.यावल (प्रतिनिधी)। शहरात सयुक्त सक्रिय क्षयरोग व कुष्टरोग शोध अभियान सर्वेक्षणची सुरुवात करण्यात आली आहे
शहरात सर्व ठिकाणी कुष्ठरोग शोध मोहिमे अंतर्गत नगर परिषदेचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करीत असल्याचे दिसून येत आहे सध्या सर्वच रोगावर उपचार मिळत आहे त्याचप्रमाणे कुष्ठरोग या रोगावर सुद्धा औषधी उपलब्ध असल्यामुळे सहज उपचार होऊ शकतो या निमित्ताने नगर पालिकेने फैजपूर शहरात सर्वत्र शोध मोहीम हातात घेतली असून शहरात सर्वत्र कुष्ठरोग या रोगावर गरजू असो किंवा कुणीही व्यक्ती असो कुष्ठरोग शोधमोहीम सुरू असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ व्हावा या हेतूने नगरपरिषदेने महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग शोध अभियानास सुरुवात केली असून चांगला प्रसिसाद मिळत असल्याचे सर्वत्र दिसत आहे
महाराष्ट्र राज्य सक्रिय क्षयरोग व कुष्टरोग शोध अभियानाची १ ते १६ डिसेंबर २०२० आज पासून फैजपुर शहरात सर्वेक्षण सुरुवात करण्यात आली फैजपुर नगरपरिषदेचे नगरसेवक शेख कुर्बान ह्यांचे हस्ते इस्लाम्पुरा फैजपूर येथे उद्घाटन करण्यात आले.
ह्या वेळी डॉ किशोर महाजन आरोग्य सेवक न पा दवाखाना फैजपुर,तालुका यावल पर्यवेक्षक राणे , अंगणवाडी सेविका सीमा कोल्हे. स्वयंसेवक राजू कोल्हे व तसेच ग्रामस्थ उपस्थीत होते.नगरपरिषदेच्या शोध मोहीम मुळे सर्व साधारण नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे .