सामाजिक

प्रचेत सोशल वेल्फेअर फाउंडेशन आमोदे मार्फत लेवा पाटीदार महिलांसाठी ऑनलाइन मेहंदी स्पर्धेचे आयोजन

आमोदा ता,यावल (प्रतिनिधी)। महिलांमधील क्रिएटीव्हिटीस, कलाकौशल्यास वाव मिळावा, कुटीरोद्योगातून आपल्या समाजातील महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात, सक्षम व्हाव्यात यासाठी प्रचेत सोशल वेल्फेअर फाउंडेशन, आमोदे, ता.यावल, जि. जळगाव ,कार्य करत आहे. त्याच उद्देशाने
लेवा पाटीदार महिलांसाठी ऑनलाइन मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा ऑनलाइन असून महिलांनी हातावर किंवा पायावर मेहंदी काढून फेसबुक ला लेवा पाटीदार कम्युनिटी या फेसबुक ग्रुप ला मेहंदी 22 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या दरम्यान अपलोड करायची आहे. यासाठी सर्वज्ञ ऍग्रो बामनोद येथील भिंगोरी मसाले , रेणुकाई गृहउद्योग आमोदे , लेवा किचन पुणे , स्वास्थ्य का प्रतीक संपूर्ण नाशिक क्रमांकानुसार बक्षिसांचे वाटप करणार आहे.

यासाठी लेवा कम्युनिटी ग्रुप चे संचालक श्री.नरेंद्र महाजन , श्री .अमोल जावळे , श्री.मोहन महाजन , सौ. वनिता कोल्हे , श्री .राहुल कोल्हे यांचे सहकार्य लाभत आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रचेत फाउंडेशन चे अध्यक्ष चेतन चौधरी यांनी केले असून अधिक माहितीसाठी ९९७०६१४३१६ हा क्रमांकावर देण्यात आला असून, तसेच स्पर्धकांनी प्रवेशिका Leva Patidar Community या फेसबुक गृप मध्ये करावयाचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!