भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

सावदा विठ्ठल मंदिरात काकडा आरतीचा कार्यक्रम नित्यपणे सुरू

सावदा (प्रतिनिधी)। येथील विठ्ठल मंदिरात दि.30/10/2020 पासून काकङा आरती नित्यपणे सुरू आहे त्या निमित्त दि.22/11/2020 रोजी आवळाष्टमी निमित्त फैजपूर रोड वरील ममता राणे नर्सरी मध्ये आवळा पुजन व भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला त्या सोबत स्नेह भोजनाचा कार्यक्रम सुध्दा उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाला दररोज काकङा आरती करणा-या महिला हेमांगी चौधरी, माधुरी भंगाळे, मनोरमा भंगाळे, शोभा चौधरी, सुमन लोमटे,मंगलाबाई काथवटे, निर्मला चौधरी,सुमन भंगाळे, विजया चौधरी,मंगला चौधरी, तसेच लहान मुली उपस्थित होत्या. उपस्थितांना राजु पंजाबी यांचे कङून सफरचंद वाटप करण्यात आले. सादर कार्यक्रम पार पाडण्यासाठी बाळासाहेब मोरेश्वर राणे, राजेंद्र चौधरी, गोविंदा महाजन,डॉ. संजय भंगाळे, विकास भंगाळे, कैलास सरोदे, किशोर(लाला)चौधरी, सोहम जावळे, मधुकर काथवटे, गुणवंत चौधरी, विनोद परदेशी, यांनी परीश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!