भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चाळीसगावराजकीय

भाजप आमदाराला अटक; आमदारांना पाठिंबा देत शिवसेना महिल्या नेत्याचा राजीनामा!

चाळीसगाव प्रतिनिधी: येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्ल्ंघन करीत राजकीय आंदोलन केले. त्यासाठी त्यांना अटक झाली. मात्र या अटकेने अस्वस्थ झाल्या शिवसेनेच्या नगरसेविका. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ  चाळीसगावच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संघटक विजया पवार यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे आंदोलन व राजीनामा दोन्ही चर्चेचा विषय ठरले आहेत. 

श्रीमती पावर यांनी शिवसेनेच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला नाही. यामुळे सोशल मीडियावर त्या ट्रोलही होत आहेत. सौ. पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी शिवसेनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. आज  तालुक्यातील शेतकरी अडचणीत असताना तब्बल सात हजार शेतकऱ्यांच्या वीज पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. याचा निषेध म्हणून तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावला जाऊन आंदोलन केले. यावेळी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात आंदोलन केले. आपल्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या भावना  समजून घेण्याऐवजी उलट आमदार चव्हाणांसह शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केली. आमदारांची भूमिका योग्य असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे फोन आपल्याला आले. त्यामुळे  शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी आमदारांची ही कृती गुंडगिरीची असेल तर शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कंपनीकडून त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार गुंडगिरीच आहे. मी देखील एक शेतकऱ्याची पत्नी, बहीण व मुलगी आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदारांना झालेल्या अटकेमुळे व्यथित झाले आहे. 

त्या म्हणाल्या या संदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात आपले सरकार असताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर मला शिवसेना महिला आघाडीच्या संघटक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार वाटत नाही. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेला पाठिंबा म्हणून मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे देत आहेत. 

श्रीमती पवार या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्यांनी पक्षाच्या महिला संघटक पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाच्या नगरसेवक पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला नाही. यावर मात्र चाळीसगावच्या स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यांच्या संघटक पदाच्या राजीनाम्याच स्वागत केले जात आहे.

तर सेनेच्या नगरसेवक पदाचा राजीनामा न दिल्याबद्दल त्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्या असल्याने त्याचाही राजीनामा द्यावा असेही नेटकरी म्हणत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!