वडोदा वनक्षेत्रातील सापाची तस्करी प्रकरणात ५ जणांना न्यायालयीन कोठडी !
मुक्ताईनगर- वडोदा वनक्षेत्रात मांडूळ सापाची तस्करी केल्याची घटना सोमवार दि.१४ रोजी घडली होती, या प्रकरणी ५ जणांना वन विभागाने ताब्यात घेतले होते तर दोन संशयित पसार झाले होते. सदरील पाच जणांना न्यायालयाने दि.१७ सप्टेंबर पर्यंत तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मांडूळ सापाची खरेदी विक्री होत असल्याची बातमी वरून सापळा रचून ५ जणांना पकडे होते तर २ जण पसार झाले, दि,१५ रोजी आरोपी प्रदीप धनराज चव्हाण रा, टाकळी , प्रवीण अमरदीप खिलारे रा, अजिसपुर ता, जि, बुलढाणा , भागवत सुनील डुकरे राहणार अजिसपुर ता, जि,बुलढाणा, पंकज रतन चव्हाण रा, मोरझीरा ता, मुक्ताईनगर , अरविंद माणिकराव कांडेलकर रा को-हाळा ता मुक्ताईनगर यांना मे, न्यायालय प्रथम वर्ग दंडाधिकारी मुक्ताईनगर यांच्यासमोर हजर केले असता मे, न्यायालयाने आरोपीची दिनांक 17 पर्यंत तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली तसेच जप्त करण्यात आलेला मांडूळ सापाला या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश देण्यात आले. अटक केलेल्याना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याना पुढील तपासासाठी मुद्देमालसह वडोदावनक्षेत्र विभाग जळगाव यांच्याकडे पुढील कार्यासाठी ताब्यात देण्यात आले. सदर संशयित आरोपीची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला आहे.
यांनी केली कारवाई-
श्री विवेक विहोसिंग उपवन संरक्षक जळगाव वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली चिमाजी कांमडेसहा वनरक्षक (मृ स व) कॅम्प जळगाव, राजेन्द्र राणे वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन भुसावल स्थित जळगाव अमोल , चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी वडोदा श्री दिगंबर गोपाळ पांचपाडे ,वनपाल चारठाणा ज्ञानोबा धुळगडे वनरक्षक वडोदा पूर्व श्रीरामअसुरे वनरक्षक चारठाणा श्री विजय अहिरे वनरक्षक राजुरा यांच्या मदतीने कार्यवाही करण्यात आली. सदर वन गुन्हा प्रकरणाचा पुढील तपास श्री चिमाजी करीत आहे.