क्राईमयावल

वाळू ट्रॅक्टर पकडल्याने मध्यस्थी आला चव्हाट्यावर !

यावल (सुरेश पाटील)। आज दिनांक 12 बुधवार रोजी यावल शहरातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीस उपनिरीक्षक यांनी पकडल्याने तसेच गेल्या चार दिवसापूर्वी यावल पोस्टेला जप्त केलेले वाळू ट्रॅक्टर ट्रॉली मध्यस्थीने रातोरात बदलून त्या ठिकाणी दुसरी ट्राली आणून उभी करून दिल्याची तसेच यावल पोलिसांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडल्याने यावल पोलीस उपनिरीक्षक यांनी त्या एका खाजगी पंटर /मध्यस्थीची चौकशी करून दंडात्मक फौजदारी कार्यवाही करावी असे संपूर्ण वाळू वाहतूक धारांमध्ये बोलले जात आहे.
आज सकाळी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीस उपनिरीक्षक यांनी पकडून यावल पोलीस स्टेशनला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले आहे यामुळे तसेच अवैध वाळू वाहतुक करीत असताना बोरावल( गेट )येथील तुषार नामक खाजगी पंटर यावल पोलिसांना बघून घेईल या नांवाखाली बाळू वाहतूकदारांकडून परस्पर हप्ते वसूल करुन वाळू वाहतूकदार आणि यावल पोलिसांची शुद्ध दिशाभूल करून आपला आर्थिक हेतू साध्य करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांच्या नांवावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या कडून खाजगी पंटर हप्ते गोळा का करतो? याची चौकशी यावल पोलिसांनी करून कड़क कार्यवाही करावी तसेच पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आणि पीएसआय यांनी आपल्या अधिकृत पोलीस कर्मचाऱ्यां मार्फत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचा कडक बंदोबस्त करावा असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

ऑडिट फैजपूर उपविभागीय कार्यालयाचे झळ मात्र यावल तहसीलदाराला-
गेल्या दीड महिन्यापूर्वी फैजपूर भाग फैजपूर येथील उपविभागीय कार्यालयाचे शासकीय ऑडिट झाले याबाबत खर्च म्हणून फैजपुर विभागातील एकाने प्रांताधिकारी यांच्या नांवाखाली रावेर व यावल तालुक्याचे तहसीलदार तसेच काही सर्कल आणि संबंधितांकडून प्रत्येकी 15 हजार रुपये अनधिकृतपणे वर्गणी वसूल केली असल्याचे तसेच यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांचे शासकीय कामकाज 100% पारदर्शी असल्याने आणि ते गैरप्रकार भ्रष्टाचार पासून 4 हाथ लांब राहत असल्याने आणि कोणाच्याही चहा पाण्याचे लिप्पीत नसलेल्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकार्‍याला कारण नसताना आपल्या स्वतःच्या वेतनातून 15 हजार रुपये द्यावे लागल्याने संपूर्ण महसूल क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे तसेच गेल्या दीड वर्षापूर्वी फैजपूर उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला होता त्या घटनेबाबत सुद्धा आता अनेक प्रश्न तालुक्यात उपस्थित केले जात आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!