सावदा येथील अँग्लो उर्दू हायस्कुल चे माजी मुख्यध्यापक व लिपिका विरुद्ध संस्थेची जिल्हा पोलिस अधिक्षक कडे तक्रार दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन |
सावदा 🙁 विशेष प्रतिनिधी ) येथील चर्चीत इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित अँग्लो उर्दू हायस्कुल सावदा चे माजी मुख्यध्यापक व आजी शिक्षक अली हैदर खान अजमल खान तसेच माजी लिपिक शेख साबीर शेख सांडू या दोघांच्या विरोधात संस्था फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणार असून या बाबत जिल्हा पोलिस अधिक्षक सह शिक्षणाधिकॎरी (माध्यमिक) कडे संस्थेने तक्रार केली आहे
या बाबत दिलेल्या निवेदना नुसार तक्रारीत असे म्हटले आहे की , संस्थने शाळा रेकार्ड तपासणी केली असता माजी लिपीक व माजी मुख्यध्यापक अली हैदर यांचे कार्यकाळातले अनेक काम चुकिचे व अपूर्ण तसेच अफरा तफर खोटे आढळुन आले आहे संबधितॎंना अनेक वेळी ताेंडी व लेखी सुचना देऊन त्यांनी अपूर्ण काम पुर्ण केले नाही, अनुदान खर्च बिला प्रमाणे साहित्य शाळेत नाही,परस्पर नातेवाईंकाचे जनरल रजिष्टर मध्ये नावात वाढवून नाव लिहले गेले आहे दाखल पात्र गुनाह आहे
तसेच माजी मुख्यध्यापक व लिपिक यांनी त्याचे कार्यकाळात मुलांना डायरेक्ट लि, स , दिले आहे व पास नापास या बाबत ची नोंद रजिस्टर न 1 केलेली नाही
तक्रारीत असेही म्हटले आहे की,माजी लिपिक यांनी घाबरुन स्वेच्छा निवृत्ती घेतली असून रेकार्ड अपूर्ण आहे विद्यार्थ्यांचे भविष्याशी खेळून नोकरी सोडणे योग्य नाही, आणि माजि मुख्यध्यापक हे माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याशी संगमत करुन संस्था विरोधी कारवाया करतात व संस्थेचे सचिव यांना दमदाटी करतात मागे असेच त्यांनी धिंगाणा केला आॕनड्यूटी मद्य सेवन करुन शाळेत येतात व तंबाखु व गुटखा खावुन शाळेत येणे, शाळेतुन रेकार्ड हेरफेर करणे, सर्व्हिस बुक गहाळ करणे इत्यादी गैर काम त्यांनी केले आहे तसेच सध्या मुख्यध्यापक यांना दमदाटी करणे, म्हणून
त्यांचावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा म्हणुन संस्थेने तक्रारी सावदा एपीआय,जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हा परिषद शिक्षण विभागा कडे केल्या असल्याचे निवेदन प्रसिद्धिस दिले आहे .