सावदा येथे कोविड-१९ तपासणी शिबिरात २ जण पॉझिटिव्ह, सावद्यातील एकाचा समावेश !
सावदा (प्रतिनिधी)। शहरात आज नगरपालिका प्रशासना अंतर्गत कोरोना विषाणू तपासणीसाठी रॅपिड अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट शिबार घेण्यात आले, एकूण १०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात २ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
चिनावल पीएससी सेंटरचे वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा शहरात घेण्यात आलेल्या कोविड-१९ साठी तपासणी शिबिरात मध्ये एकूण १०३ जणांची तपासणी करण्यात आली त्यात १०१ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर २ कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात एक ६२ वर्षीय रुग्ण सावद्यातील गांधी चौक परिसरातील रहिवासी आहे तर १ रुग्ण सावखेडा येथील रहिवासी आहे. सदरील शिबिरास सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी भेट दिली.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या १०३ झाली असुन त्यात १० मयत, ८ उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे