भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शिवसेना, राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेस फुटणार? काँग्रेसला थांबवून ठेवलंय, भाजप नेत्याच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार? काँग्रेसला थांबवून ठेवलंय, असं गिरीश महाजन यांनी वक्तव्य करत नेमका काय संकेत दिलाय,भाजप नेते गिरीश महाजन यांच्या सुचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरु आहे. भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. सर्व पक्ष तर मला इथेच दिसत आहेत, जे असतील नसतील ते, कुणी सुटलेलं नाही. शिवसेना आहे, आम्हीपण आहोत, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, आता काँग्रेसपण येईल, पण काँग्रेसला सध्या थांबलेलं आहे, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर पलटवार करत “मुंगेरीलाल के हसीन सपने, तशी गोष्ट आहे. गिरीश महाजन काय, गिरीश महाजनांच्या २० पिढ्या आल्या तरी राज्यात काँग्रेसला फोडू शकणार नाहीत एवढं दाव्यावने मी सांगतो”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!