जामनेरसामाजिक

“एक राखी भारतीय सैनिकांसाठी” जमनेरच्या वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम

जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आपल्या भारत भूमीचे संरक्षण करणाऱ्या या देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने जामनेर येथील वंदन मातृभूमी प्रतिष्ठाच्या वतीने राखी पाठवण्यात आली.

काश्मीर,हिमाचल प्रदेश,ओरिसा या राज्यातील २००० पेक्षा जास्त जवानांना राखी पाठवण्यात आलेली आहे. जामनेर शहरातील वेगवेगळ्या शाळा महाविद्यालय यांना वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आलेले होते.

“एक राखी भारतीय सैनिकांसाठी” या आवाहनाला साथ देत हजारो विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांसाठी रक्षा पाठवण्याची व्यवस्था केली.या कार्यक्रमाप्रसंगी वंदन मातृभूमी प्रतिष्ठाण चे राहुल भाऊ चव्हाण,शांताराम काळे,अंकुश जोशी,शेख सईद,शेख इम्रान, मयुर चौधरी, निलेश देवरे,संजय सपकाळ, हर्षल सूर्यवंशी,योगेश गोसावी आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!