हतनूर धरणाचे १२ दरवाजे उघडले, धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे तब्बल १०+२ = १२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली आहे.
राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुव्वाधार पाऊस पडत आहे. त्यातच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्या मुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले होते. सततच्या पाण्याच्या वाढीने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. त्या नंतर एकूण १२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.त्या मुळे तापी नदी काठच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हतनूर धरण सद्यस्थिती …
दिनांक – २९/७/ २०२४
वेळ – १० वाजता
पाणी पातळी – २१०.९१० मी.
एकुण पाणी साठा= २३०. दलघमी.
एकुण पाणी साठा टक्केवारी = ५०.४१ %
विसर्ग- १८२२ क्युमेक्स (६४३४४ क्युसेक्स)
पूर्ण १२ दरवाजे उघडले आहेत.