मोठी बातमी : अजित पवार गटाच्या आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं भाष्य
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अपात्रता प्रकरणावर सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी मोठं भाष्य केलं. “तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये” असा सवाल यावेळी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला थेट सवाल केला.
आज सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालायत सुनावणी झाली. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांना अपात्र करण्याची शरद पवार यांच्या पक्षाची याचिका आहे. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही अपत्राता प्रकरणांवरील सुनावणी पुढे एकत्र घेण्यात येणार आहे.


