भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव मध्ये २९ लाखांची रोकड व तीन किलो चांदी सह सोने जप्त, पथकाच्या कारवाईने खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव मध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची कसून चौकशी करण्यात येत असून याच दरम्यान ममुराबाद नाका येथे एका कारमध्ये २९ लाख रुपयांची रोकड, तीन किलो चांदी, आठ तोळे सोने आढळून आले. या मुद्देमालाच्या पावत्या संबंधितांकडे नसल्याने पथक व तालुका पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात दिला.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात येणाऱ्या वेगवेगळ्या सहा मार्गावर स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. अशाच प्रकारे ममुराबाद तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना, जळगावकडे येणाऱ्या एका कारमध्ये (क्र. एमपी ०९, सीयू २२१८) २९ लाख रुपयांची रोकड, तीन किलो चांदी, आठ तोळे सोने आढळून आले. कारमधील राकेश दामोदरदास श्रॉफ (४८), जस राकेश श्रॉफ (२१, दोघे रा. पांडुमल चौक, बऱ्हाणपूर) व चालक नवीन किशोरीलाल भावसार (३५, रा. शिकारपुरा, बऱ्हाणपूर) यांना या मुद्देमालाविषयी पथकाने विचारणी केली. त्या वेळी त्यांनी बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथून जळगाव येथील सराफा दुकानांमध्ये सोन्याची शुद्धता तपासणी करण्यासाठी व नवीन दागिने खरेदी करण्यासाठी रोकड व सोने-चांदी घेऊन जात असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!