एकनाथ शिंदेना प्रहारचे बच्चू कडूसह 35 आमदाराची साथ, विमानाने गुवाहाटीत नेले
सुरत, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पहिला फोटो आता समोर आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत 30 ते 36 आमदार असल्याची बातमी समोर येत होती. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबत नेमके कोणकोणते आमदार आहेत याची थेट माहिती देणारा फोटोच आता समोर आला आहे. शिंदेसह 36 आमदार आहेत.
हा फोटो ‘मंडे टू मंडे न्युज’च्या हाती लागला आहे. विशेष म्हणजे प्रहार संघटनेचे आमदार स्वत: बच्चू कडू हे देखील या आमदारांसोबत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यात जळगाव जिल्ह्यातील तीन आमदारांचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. किशोरआप्पा पाटील, चिमणराव पाटील आणि लताताई सोनवणे या तीन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे समर्थक अपक्ष आमदार जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी मात्र शिवसेनेच्या सोबतच असल्याचे दिसत आहे.
शिंदे समर्थक आमदार–
एकनाथ शिंदे
बच्चू कडू
विश्वनाथ भोईर
राजकुमार पटेल
महेंद्र थोरवे
भारत गोगावले
महेंद्र दळवी
अनिल बाबर
महेश शिंदे
शहाजी पाटील
शंभुराज देसाई
बालाजी कल्याणकर
ज्ञानराज चौगुले
रमेश बोरणारे
तानाजी सावंत
संदिपान भुमरे
अब्दुल सत्तार
नितीन देशमुख
प्रकाश सुर्वे
किशोर पाटील
सुहास कांदे
संजय सिरसाट
प्रदीप जैस्वाल
संजय रायमुलकर
संजय गायकवाड
शांताराम मोरे
श्रीनिवास वनगा
प्रताप सरनाईक
प्रकाश आबिटकर
चिमणराव पाटील
नरेंद्र बोंडेकर
लता सोनावणे
यामिनी जाधव
बालाजी किनिकर
उदयसिंह राजपूत
गीता जैन
आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही – एकनाथ शिंदे
रात्री 3 वाजता शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेच्या माझ्यासोबतच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे त्यांनी हिंदुत्वाची जी शिकवण दिली त्यावर आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी असो किंवा मग राजकारणासाठी असो हिंदुत्वाचे बाळासाहेबांचा आहे ते कडवट हिंदुत्व ही भूमिका ही भूमिका आम्ही सर्व जण पुढे घेऊन जातोय. आम्ही सगळे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही आम्ही शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढच्या राजकारण समाजकारण करणार आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे त्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही आणि हाच विचार पुढे घेऊन जातोय.