मविआ सरकार धोक्यात ! शिंदे गट भाजपला समर्थन करणार : राज्यपालांकडे पत्र देणार !
गुवाहाटी, वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आता शिवसेनेत दोन गट पडल्याच दिसतंय. तर यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातंय. एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबईत दाखल होणार असून ते आपल्या गटाचा भाजपला पाठींबा असल्याचे पत्र राज्यपालांना देणार आजच ठाकरे सरकार पडण्याची शक्यता बळावली आहे. तर विद्यमान राज्य सरकारचे काऊंट डाऊन सुरू झाल्याचं बोललं जातं आहे.
- प्रशासक राजवटीत ‘आरोग्य’च्या नावावर खर्च… पण हिशेबच गायब..! आरोग्य विभागाच्या रेकॉर्ड बुकमध्ये खर्चाच्या नोंदीच नाहीत… माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड
- ‘बदली’चा डाव अर्ध्यावर?; मुख्याधिकाऱ्यांचे तात्काळ बदलीचे प्रयत्न अपयशी ! वेगळीच चर्चां
- सावद्यात लेआउट मंजुरींचा ‘काळाबाजार’ ? लाखोंच्या व्यवहारातून नियमांना तिलांजली ! अनधिकृत मंजुरींचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये दुपारी येतील. राज्यपालांची भेट घेतली, असंही सांगितलं जातं आहे. एका विशेष विमानाने एकनाथ शिंदे हे मुंबईला येणार असल्याचं कळतंय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदेंचं बंड हे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातंय. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्याही बंडखोर आमदाराने बंडखोरी केली नाही, असं वक्तव्य करत गर्व से कहो हम हिंदू है म्हणत बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सूरत विमानतळावरून गुवाहाटीमध्ये पोहचले आहेत.





