मालेगावात बनावट ३९७७ जन्म दाखले रद्द ; ८११ आरोपी, ४७ वकिलांना अटक, १२५ एजंट, ३५ सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई
नाशिक,मंडे टु मंडे न्युज | नाशिक मधील मालेगाव इथल्या बनावट जन्म दाखल्यांचा पाठपुरावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरूच ठेवला आहे. त्यांनी महापालिका अधिकारी आणि अप्पर पोलिस अधीक्षकांची चर्चा करत प्रकरणाची माहिती घेतली.

मालेगावमध्ये ३ हजार ९७७ बनावट जन्म दाखले रद्द करण्याचा आदेश देण्यात आले असून, त्यातील ३ हजार २७६ जन्म प्रमाणपत्र ५६ मृत्यू प्रमाणपत्र अर्जदार घेऊन गेले, तर ७०० जण जन्मदाखला तयार होऊनही घेऊनच गेलेले नाही. आतापर्यंत या प्रकरणी ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८११ जणांना आरोपी करण्यात आले.
या वेळी मालेगाव बनावट जन्म दाखले प्रकरण हे एका मोठ्या घोटाळ्याशी संबंधित आहे, असा किरीट सोमय्या यांचा सुरूवातीपासून आरोप आहे. यात बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांना भारतीय नागरिक असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रकरणात अधिकारी आणि नागरिकांवर देखील गुन्हे दाखल झालेत.
आरोपींमध्ये ४७ वकिलांचा समावेश असून, त्यांना अटक करण्यात आली. १२५ एजंट, ३५ सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. हे सर्व बनावट प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. २ हजार २१४ जन्म प्रमाणपत्र महापालिकेने परत घेतले आहे, तर ९४६ लोक प्रमाणपत्र घेऊन गायब झाले.
महसूल विभागातील तहसीलदार अन् नायब तहसीलदांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ED) सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनीही छापेमारी केली आहे
मालेगावात दाखल झालेल्या पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ८११ संशयीत आरोपी निष्पन्न झाले असून हा आकडा लवकरच एक हजारावर जाईल, असा दावा सोमय्या यांनी केला. तसेच रद्द झालेल्या जन्म प्रमाणपत्रांपैकी २२१४ प्रमाणपत्रे संबंधितांनी परत केले आहेत. ९४६ जण प्रमाणपत्रे परत न करता गायब झाले आहेत. त्यांच्या निवासाचा ठावठिकाणा लागत नाही. त्यामुळे ते कुठले आहेत,असा प्रश्न पडतो. या लोकांना फरार म्हणून घोषित करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली. हा घोटाळा भारतातील सर्वात मोठा जन्म प्रमाणपत्र घोटाळा असून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित तो गंभीर मुद्दा असल्याने राज्यातील दहशतवादी विरोधी पथक तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणा व केंद्रीय गुप्तचर खात्याने त्याचा तपास करावा,अशी आपली मागणी आहे. तसेच त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे विनंती करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

