भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

खाकीवर डाग! पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप, महिला डॉक्टरची आत्महत्या,गृहखात्याची अब्रु वेशीवर, रक्षकच बनला भक्षक..!

मुंबई, मंडे टु मंडे न्युज|पोलिसांच्या खाकीला डाग लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात रक्षकच भक्षक बनल्याचे समोर आले आहे. एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना साताऱ्यातील फलटणमध्ये घडली.

ही महिला डॉक्टर फलटण शासकीय रुग्णालयात कार्यरत होती. तिने आत्महत्येपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली होती. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आणि घरमालकाच्या मुलावर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून साताऱ्यामध्ये महिला डॉक्टराने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

साताऱ्यातील फलटण येथील शासकीय रुग्णालयात ही महिला डॉक्टर कार्यरत होती. तिने गुरूवारी फलटणमधीलच एका हॉटेलमधील खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने बलात्कार, शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप करत हातावर सुसाईड नोट लिहून त्यावर तिने दोन पोलिस उप निरीक्षक आणि घर मालकाच्या मुलावर गंभीर आरोप करत आयुष्य संपविले .

त्या महिला डॉक्टर ने आत्महत्या करण्या पूर्वी लिहिले होते की, पोलिस उपनिरीक्षक आणि घरमालकाच्या मुलाने माझा शारीरिक आणि मानसिक छळ करून माझ्यावर ४ वेळा बलात्कार केला. मुळची बीडची असलेली ही महिला डॉक्टर फलटणमधील शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्याचे काम करत होती. या डॉक्टरवर पोलिसांकडून वारंवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता, असा आरोप तिचे काका आणि आत्याच्या मुलाने केला आहे.

या प्रकरणासंदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले की, संबंधित महिला डॉक्टर ही फलटण तालुक्यातील एका शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत होती. ती संशयित आरोपी प्रशांत बनकर याच्या घरात राहात होती. बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास तिने फलटण येथील एका हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी रूम बुक केली होती. सकाळी सात वाजता हॉटेल कर्मचाऱ्यांनी चहा, नाश्त्यासाठी रूमचा दरवाजा ठोठावला. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजता जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. तेव्हाही काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे हॉटेल प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली.


घटनेची माहिती मिळताच फलटण शहर पोलिसांनी हॉटेल गाठले. दरवाजा उघडला जात नसल्यामुळे पोलिसांनी हॉटेल प्रशासनाच्या मदती ने दरवाजा उघडला. मात्र आत मध्ये महिला डॉक्टरने गळफास घेतल्याचे दिसून आले. या बाबतची माहिती नातेवाइकांना देण्यात आली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. महिला डॉक्टर च्या मृतदेहाची पाहणी करताना हातावर काही तरी लिहिले असल्याचे समोर आले. त्यामध्ये उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचे नाव लिहिले होते. दोघांनी गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ तसंच बलात्कार केल्याचे डॉक्टरने हातावर लिहिले होते. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

धक्कादायक प्रकार :
महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने चार महिन्यांपूर्वी कामांमध्ये वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरलेल्या एका संशयित व्यक्तीला पात्र ठरविण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने, पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, साहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे या पोलिस अधिकाऱ्याकडून वारंवार दबाव येत असल्याची लेखी तक्रार फलटणच्या पोलिस उपअधीक्षकांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. याच त्रासाला ती कंटाळली होती असे देखील सांगितले जात आहे.

राजकीय व पोलिसांचा दबाव –
महिला डॉक्टरच्या भावाने सांगितले की, माझी बहीण दोन वर्षांपासून या रुग्णालयात कार्यरत आहे. एक वर्षापासून शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी, चुकीचा देण्यासाठी तिच्यावर राजकीय आणि पोलिसांचा दबाव येत होता. याबाबत तिने तिच्या डॉक्टर असलेल्या बहिणीला सांगितले होते. परंतू एवढा गंभीर त्रास असेल असे आम्हाला वाटले नव्हते. या त्रासाबाबत तिने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती. परंतु त्यावर कारवाई झाली नाही. माहिती अधिकारात तिने माहिती मागूनही दिली गेलेली नाही. तिने हातावर संशयितांची नावे लिहिली आहेत. त्या सर्वांविरोधात कठोर कारवाई करावी.अशी मागणी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!