गणेशोत्सवा निमित्त आयोजित भंडाऱ्याच्या कार्यक्रमात जेवण केल्याने ५० ते ६० विद्यार्थ्यांना विषबाधा
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गणेशोत्सवानिमित्त आयोजित भंडाऱ्याच्या कार्यक्रमात जेवण केल्यानंतर ५० ते ६० मुलांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवार रोजी पारोळा तालुक्यातील शिवरे येथे घडली. मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक विद्यालय, शिवरे येथे शुक्रवार दि. १३ रोजी गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनींनी जेवण केले. जेवण केल्या नंतर मात्र सुमारे ५० ते ६० विद्यार्थी विद्यार्थिनींना उलट्या, चक्कर, मळमळ होणे, हातपाय गळणे आदी त्रास होऊ लागल्याने त्यांना लगेच शाळेतील शिक्षक व पालकांनी प्रथम तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार झाल्यानंतरही त्रास होत असल्याने पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.तर काहींना धुळे येथे दाखल करण्यात आले.
तर धुळे येथे दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य स्थिर झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. श्रुती कैलास बेलेकर, ऐश्वर्या जगन महाले या दोन विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याने त्यांना धुळे येथे हलवण्यात आले आहे.
शिवरे दिगर येथील स्वर्गीय वसंतराव जीभाऊ बहुउद्देशीय संस्था संचलित सारंग माध्यमिक विद्यालयात शुक्रवार रोजी ७ दिवसाच्या गणपती विसर्जनानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वरण, भात, गुलाब जामुन, मठाची भाजी असे जिन्नस होते. विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर त्यांना काही तासानंतर मळमळ, चक्कर असा त्रास होऊ लागला. या वेळी अन्नातूनच विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.
या विद्यार्थ्यांना झाला विषबाधा –
नम्रता मच्छिंद्र कांडेकर, आरव्ही संभाजी पाटील, पूर्वी दीपक पाटील, धनश्री दीपक पाटील, दिव्या अमोल पाटील, कौशल्या भिकन जोगी( तरवाडे ), गायत्री जितेंद्र पाटील, मयुरी ईश्वर पाटील, प्रणाली सुभाष पाटील, तनुश्री प्रदीप पाटील, विशाल संजय निकम, कृष्णा प्रल्हाद पाटील, अंजली योगेश पाटील, पल्लवी विलास पाटील, जयेश ब्रिजलाल पाटील, राकेश किशोर पाटील, आदित्य गोरख कांडेकर, दिव्या उत्तम पाटील, दर्शना ब्रिजलाल पाटील, वेदांत बुराजी कांडेकर, कोमल समाधान पाटील, जगदीश अरुण पाटील, घनश्याम विठोबा पाटील, अक्षय विठोबा पाटील, घनश्याम निंबा पाटील, अक्षय निंबा पाटील, सागर अनिल भिल, अर्जुन महादेवराव पाटील, अश्विनी भिला शेळके, नंदिनी बारकू पाटील, माधुरी शेळके, प्रेरणा अनिल कोळी, चैताली माधवराव पाटील, वैष्णवी अशोक पाटील, भूषण डोंगर भिल, समाधान रवींद्र सरदार, साधना नारायण मिस्तरी, दुर्वेश आनंदा पाटील,जगदीश अरुण पाटील, कुणाल सुपडू बेलेकर, सोपान राजाराम भिल, कोमल समाधान पाटील.