भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

लग्न झालेल्या शिक्षकाने शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत अत्याचार, शिक्षकासह त्याच्या आई विरुद्ध गुन्हा दाखल

मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l लग्न झालेल्या शिक्षकाने लग्नाचे अमिष दाखवून शिक्षिकेची फसवणूक करत तीन वर्षांपासून शिक्षिकेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव मध्ये घडली. आरोपी शिक्षकाचे नाव प्रशांत सूर्यभान झाल्टे. रा. पिंप्राळा. जळगाव .असे आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा येथे राहणाऱ्या प्रशांत सूर्यभान झाल्टे या शिक्षकाने सन २०२१ पासून एका शाळेत शिक्षिका असलेल्या एका महिलेसोबत सहानुभुती दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच तू मला खूप आवडते असे सांगून तीला लग्नाचे अमिष दाखविले. व तीच्याची गेल्या तीन वर्षांपासून शरीर संबंध ठेवले. तसेच प्रशांत झाल्टे याने
शिक्षिकेला, आपले लग्न झाले असल्याची कुठलीही माहिती न देता लग्न झाल्याची माहिती लपविली.

शिक्षिकेने त्याला लग्नाविषयी विचारले असता तो नकार देऊ लागला. त्यानंतर सदर शिक्षिका त्याच्या घरी गेली असता त्याने नकार कायम ठेवला. त्या वेळी त्याच्या आईने शिक्षिकेला सांगितले की, त्याचे लग्न झालेले आहे, तुला या घरात यायचे असल्यास त्याच्या लहान भावाशी लग्न करावे लागेल, मात्र त्या शिक्षक महिलेने या गोष्टीस नकार दिला.

अखेर शिक्षिकेने जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून शिक्षक प्रशांत झाल्टे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच  शिक्षकाच्या आई विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!