भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयताज्या बातम्या

भारताच्या ‘या’ कारवाईने पाकिस्तानचा थयथयाट!

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील निम्मे कर्मचारी कमी करण्याच्या सूचना दिल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. पाकिस्तानने भारताची कारवाई चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

भारत सरकारने (Ministry of External Affairs) नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या (pakistan high commission new delhi ) उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्यास सांगितल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानकडून भारतावर आरोप करण्यात येत आहे.

पाकिस्तानने भारताच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयातील उप उच्चायुक्तांना बोलावून घेत आपली भूमिका स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानवर लावलेले आरोप निराधार असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांनी कायम आंतरराष्ट्रीय कायद्यांना अनुसरून कामकाज केले असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताने केलेल्या कारवाईला उत्तर म्हणून पाकिस्ताननेही भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील ५० टक्के कर्मचारी कपात करण्यास सांगितले आहे. भारताच्या या निर्णयामुळे आता दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५५-५५ इतकी असणार आहे.

चीनशी सीमेवर संघर्ष उडालेला असतानाच पाकनेही काश्मीरमधील सीमेवर गोळीबार व उखळी तोफांचा मारा सुरू ठेवला आहे. गेल्या महिनाभरात यामध्ये चार भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. पाकने निवासी भागांतही हा शस्त्रास्त्र हल्ला सुरू ठेवला आहे. त्यास भारतीय जवानांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले. सीमेवर संघर्ष सुरू असतानाच, नवी दिल्लीतील पाकिस्तानचे उच्चायुक्तालयही भारतीय गुप्तचरांच्या नजरेत आले होते. तेथील काही कर्मचारी भारताविषयीची संवेदनशील व गोपनीय माहिती गोळा करीत असल्याचे तसेच भारताविरुद्ध हेरगिरीच्या प्रयत्नांत असल्याचे दुवे गुप्तचरांच्या हाती लागले होते. त्यामुळे भारताने हा मुद्दा वारंवार पाकच्या राजनैतिक पटलावर मांडला होता. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील दोन व्हिसा सहाय्यकांना ताब्यात घेतले होते. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित गोपनीय माहितीची हेरगिरी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर भारताने या अधिकाऱ्यांना पर्सोना-नॉन ग्रेटा जाहीर करत पाकिस्तानला पुन्हा पाठवले.

त्याशिवाय, पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांना आयएसआयकडून धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याआधी भारतीय राजनयिक गौरव अहुवालिया यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून त्रास दिला जात असल्याचे समोर आले होते. गौरव अहुवालिया यांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अहुवालिया यांचा बाइकस्वाराकडून पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याशिवाय त्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर संशयास्पद हालचाली करत असलेल्या काही अज्ञात व्यक्ती आढळल्या दिसल्या होत्या

वाचा- न्हावी-फैजपुर परिसराच्या शेतशिवारात सामूहिक अत्याचाराच्या चर्चेला उधान !

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!