भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

५० फूट उंचीवर टॉवरवर चढून २५ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

रावेर तालुक्यातील घटना

रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील विवरे येथील खिर्डी रोडवरील विवरे शेत शिवारात संतोष देवचंद तेली यांचे शेतात महावितरणच्या टॉवरवर थेट ५० फूट उंच चढून एका परप्रांतीय  २५ वर्षीय तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव ब्रिजेश कुमार काटकु बायगा (वय २५ रा. भरतपुर, जिल्हा कोरिया, छतीसगढ) असे  आहे.

मंगळवारी ब्रिजेशकुमार हा तालुक्यातील विवरे खिर्डी रस्त्यावरील संतोष देवचंद तेली यांच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या पावरग्रिटच्या अत्तीउच्च विद्युत क्षमतेच्या मोठ्या टावरवर सुमारे ५० फुटवरती चढला. कापडच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महात्या केल्याची घटना घडली.

ब्रिजेश कुमार याची पँट व टोपी त्या ठिकाणी आढळून आली. त्याची पँटमधुन पॅन कार्ड आढळून आल्याने त्यावरून पोलीस प्रशासनाने त्याचे नातेवाईकांशी संपर्क केला. त्यावरून त्याची ओळख पटली. ब्रिजेश याला पावर ग्रिटच्या अकोला पथकाच्या सहकार्यने खाली उतरविण्यात आले असुन रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तो रावेर तालुक्यात नेमका कशासाठी आला होता हे समजू शकले नाही.

निंभोरा पोलीस स्टेशनला पोलीस पाटील रितेश चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश पाटील हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!